चिकलठाणा एमआयडीसीत तरुणीला दोघांनी लुटले

Foto
 मैत्रिणी सोबत पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी गेलेल्या 19 वर्षीय तरुणीला दुचाकीवर आलेल्या दोघांनी दमदाटी करीत 17 हजाराचा मोबाईल हिसकावल्याची घटना चिकलठाणा एमआयडीसी परिसरात घडली. याप्रकरणी दोन अज्ञात आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, रश्मी बाबासाहेब नरवडे वय-19 (रा.एन-2, मुकुंदवाडी) व  मैत्रीण दामिनी डोंगरे या दोन्ही तरुणी 9 ऑगस्ट रोजी सकाळी साडेपाच वाजता नित्या प्रमाणे पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी चिकलठाणा एमआयडीसी भागात गेल्या होत्या. काही वेळ सराव केल्यानंतर दामीनीला कॉल करायचा असल्याने  दोघीही मॉस्को कॉर्नर चौकात थांबल्या. रश्मीने तिचा मोबाईल  खिशातून बाहेर काढला. दरम्यान एका विना क्रमांकाच्या दुचाकीवरून 18 ते 20 वयोगटातील दोन तरुण तेथे आले. दमदाटी करून बळजबरीने रश्मीच्या हातातील मोबाईल हिसकवला व तेथून कलाग्रामच्या रस्त्याने पळाले. दोघींनी आरडाओरड केली. मात्र रस्त्यावर कोणीही नसल्याने मदत मिळाली नाही. रश्मीने मंगळवारी घडलेली हकीकत वडिलांना सांगितल्यानंतर एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात दोन अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker